महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘तांडव’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
पवई : ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून अभिषेक प्रोडक्शन प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित तांडवया मराठी सिनेमाचे पोस्टर अनघा अशोक सातवसे (पोलीस निरीक्षक, पवई) आणि प्रियांका तात्यासाहेब पाटील (पोलीस उपनिरीक्षक, पवई) यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले.
 

महिला सबलीकरणाच्या अनेक गोष्टींविषयी केवळ बोलले जाते, परंतु त्यावर आधारित मराठी सिनेमे फारसे प्रेक्षकांच्या भेटीला येत नाहीत. महिला सबलीकरणावर आधारीत तांडवया मराठी सिनेमाची निर्मिती सुभाष गणपतराव काकडे यांनी केली आहे. सिनेमाची संकल्पना रामेश्वर काकडे यांची आहे. सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शनाच्या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या अनघा अशोक सातवसे आणि प्रियांका तात्यासाहेब पाटील यावेळी म्हणाल्या की, “सिनेमा हे क्षेत्र प्रभावी माध्यम आहे. ‘तांडव’ या सिनेमातून महिला सबलीकरणाचा विषय सादर करण्याचा प्रयत्न हा कौतुकास्पद आहे. सर्वच क्षेत्रांतील महिलांच्या उत्तुंग अशा कामगिरीबद्दल नेहमीच बोलले जाते, परंतु त्यावर आधारीत नायिकाप्रधान सिनेमे क्वचितच प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ‘तांडव’ हा सिनेमा महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आम्ही आशा बाळगतो”.

 
 

 
 

अरूण नलावडे, पूजा रायबागी, नील राजूरीकर, आशिष वारंग, स्मिता डोंगरे, सुप्रिया गावकर आणि सयाजी शिंदे या कलाकारांच्या ‘तांडव’ सिनेमामध्ये प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक संतोष जाधव यांना गेल्या १८ वर्षांपासून सिनेमा क्षेत्रात संकलन आणि दिग्दर्शनाचा अनुभव आहे. त्यामुळे ‘तांडव’ सिनेमाचे दिग्दर्शन करण्यास त्यांना खूप मदत झाली. सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक संतोष जाधव म्हणाले की, ‘तांडवसिनेमाची गोष्ट एका कर्तव्यनिष्ठ महिला पोलीस अधिकारिच्या जीवनावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श ठेवून जगणारी ही नायिका आहे. पुजा रायबागीने ही भूमिका खूप दमदार पद्धतीने साकारली आहे. सिनेमामध्ये या नायिकेचा संघर्ष सत्तेतील राजकारण्यांशी होतो. त्यांच्याशी ती कसा सामना करते, हे सिनेमात दाखविण्यात आले आहे.

 

सिनेमामध्ये मोठ्या प्रमाणात अॅक्शन सीन्स दाखविण्यात आले आहे. लवकरच ‘तांडव’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाची कथा सुभाष गणपतराव काकडे यांनी लिहिली असून पटकथा, संवादलेखन प्रशांत निगडे यांनी केले आहे. रोहन पाटील, अशोक काजळे आणि नविन मोरे यांनी ‘तांडव’ हा सिनेमा संगीतबद्ध केला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@