हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : मुंबईतील २६-११ हल्ल्याचा मुख्य सुत्रधार आणि लष्कर-ए- तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दणका दिला आहे. हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त करण्यात आला असून बंगला कोट्यवधी रुपये किमतीचा असल्याचे समजते.

 

हाफिज सईदने काश्मीरमधील उद्योजक जहूर अहमद शाहर वटालीच्या मदतीने गुरुग्राममध्ये बंगला विकत घेतला. फलाह-ए- इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संस्थेच्या माध्यमातून ही रक्कम उभी केल्याचा संशय ईडीला असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

 

जहूरला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादाला आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी अटक झाली होती. त्याच्या चौकशीतून हाफिज सईदच्या मालमत्तेचा उलगडा झाला. बंगल्यासाठीचे पैसे यूएईतून हवालामार्गे भारतात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले असून हाफिज सईदने बनावट नावांचा वापर करुन भारतात तब्बल २४ ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात आढळले आहे.

 

उर्वरित मालमत्ता जप्त होणार

मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचा तपशीलही ईडीने गोळा करण्यात आला असून त्याद्वारे खरेदी करण्यात आलेल्या उर्वरित मालमत्ताही जप्त करण्यात येणार आहेत. पुलवामा येथील हल्ल्यानंतर हाफिज सईद आणि मसूद अझहर या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांविरोधात भारताने कठोर भूमिका घेतली असून हाफिजवर मुंबई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने १० डिसेंबर २००८ बंदी घातली.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


pasting
 
 
@@AUTHORINFO_V1@@