लंडनमध्येही दुमदुमला 'नमो अगेन'चा नारा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019
Total Views |



लंडनस्थित भारतीयांनी काढली भव्य बाईक रॅली


लंडन : भारताची व भारतीयांची शान सर्वच बाबतीत जगभर वाढत आहे. हा मोदी सरकारच्या विदेशनीतीचा करिष्मा मानला जातो. 'अभिनंदन' प्रकरणावेळी याचे ताजे उदाहरण आपण नुकतेच पहिले होते. विदेशात स्थायिक झालेले भारतीयही भारताची शान उंचावण्याचे प्रयत्न करत आहेत. असाच एक आगळावेगळा कार्यक्रम लंडन येथे पाहायला मिळाला. लंडनस्थित भारतीयांनी 'सपोर्ट ऑफ इंडिया'या शीर्षकाखाली भव्य बाईक रॅलीचे यशस्वी आयोजन केले. समस्त भारताची शान सर्वच बाबतीत जगभर वाढत असून त्याची महती अनेकांपर्यंत पोहचावी असा यामागील हेतू होता.

 

 
 

भारतातून विदेशात गेलेली मंडळी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. एस कॅफेच्या उत्तरेकडील भागातून निघालेली ही रॅली नॅसडेन येथील श्री स्वामीनारायण मंदिरापर्यंत आयोजित केली होती. या बाईकस्वारांनी 'नमो अगेन'चे टीशर्ट परिधान केले होते. सुमारे चार तास लंडनच्या रस्त्यावर मोठा उत्साह दिसून आला. 'एस कॅफे' लंडन या लंडनमधील प्रसिद्ध मोटरसायकल समूहाचे स्वारदेखील स्वतःहून या रॅलीत सहभागी झाले होते. रॅली श्री स्वामीनारायण मंदिरापाशी आल्यानंतर लहान मुलांनी या रॅलीचे भव्य स्वागत केले. पारंपारिक वेषात या मुलांनी गणेश श्लोक गायले. भारताची आजवरची प्रतिमा बदलण्यासाठी प्रगतशील भारतातील मुलभूत सोयीसुविधांचे प्रदर्शन बाईकस्वारांनी फलकातून दाखवून दिले. रस्त्यांचे जाळे, बदललेले ग्रामीण जीवन, सोयीसुविधा आदींचे दर्शन या फलकातून दिसून येत होते.

 

 
 

ऐतिहासिक मार्बल आर्क, ट्रॅफलगर स्क्वेअर, पार्लमेंट स्क्वेअर, लंडन ब्रिज या परिसरातील नागरिकांनीही स्वागत करून आपलादेखील भारताला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले. यावेळी भारत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान, या उपक्रमापासून प्रेरणा घेत विदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी अशाप्रकारची रॅली बर्मिंगहम, मिल्टन किनेस, मँचेस्टर, लीड्स आणि स्कॉटलंड येथे घेण्याचे निश्चित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे समस्त भारतीयांना अभिमान वाटत असून बदलत्या भारताचे चित्रण विदेशातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा त्यांचा निर्धार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@