आता बाबाही होतोय आई!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019   
Total Views |



 
 
मातृत्व ही ‘स्त्री’ला ईश्वराने दिलेली नैसर्गिक देणगी आहे. दर महिन्याला होणारी रजस्वलेची प्रक्रिया स्त्रीला ‘तू आई होण्यास सक्षम आहेस’, हेच जणू सांगत असते. ‘तुला नऊ महिने पोटात वाढवले आहे मी,’ असे संवाद अनेक घरात ऐकायला मिळतात. ‘आईपण काय असते हे स्वत: आई झाल्याशिवाय कळत नाही,’ असे अनेक वडीलधाऱ्या स्त्रिया आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या बायकांना सांगताना तुम्ही ऐकले असेल. पण हे झाले, स्त्रियांच्या बाळंतपणाविषयी, पण पुरुषांच्या बाळंतपणाविषयी तुम्ही ऐकले आहे का? हो, पुरुषही आता बाळंत होऊ लागले आहेत. आता तुम्ही म्हणाल की, हे कसे शक्य आहे? पुरुषांना गर्भाशय कुठे असते? काही तृतीयपंथी पुरुष जोडपी सरोगसीच्या मदतीने पालकत्व प्राप्त करतातही, पण बाळाला स्तनपान करवणाऱ्या मातृत्वाची सर सरोगसीला नाही. यावर पर्याय शोधून काढत, मातृत्वाचे सुख प्राप्त करण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रियेचा वापर करण्यात येऊ लागला. अमेरिकेत राहणाऱ्या वायली सिम्पसन या तृतीयपंथी व्यक्तीने लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली. शस्त्रक्रियेनंतर वायली सिम्पसनचे एका स्त्री शरीरात रुपांतर झाले. पुढे गर्भधारणा होऊन वायलीने एका बाळाला जन्म दिला. या मुलाचे नाव रोवन ठेवण्यात आले. रोवन आता सहा महिन्यांचा झाला आहे. पण रोवनच्या वेळी गर्भावस्थेत असताना वायलीला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता भविष्यात दुसरे अपत्य जन्माला न येऊ देण्याचा निर्णय वायलीने घेतला. वायली सिम्पसन ही बाळाला जन्म देणारी जगातील पहिली तृतीयपंथी व्यक्ती नव्हे. यापूर्वीही बऱ्याच तृतीयपंथीयांनी लिंगबदल शस्त्रक्रियेद्वारे मातृत्वाचा लाभ घेतला आहे. २०१० साली अमेरिकेतील थॉमस बिटाय या तृतीयपंथीयाने बाळाला जन्म दिला. थॉमसला आता ४ अपत्ये आहेत. थॉमस बिटाय हा आई होणारा जगातील पहिला पुरुष ठरला. थॉमसचे अनुकरण अनेक तृतीयपंथीयांनी केले. वायली सिम्पसननेदेखील थॉमसच्या पावलावर पाऊल ठेवले. दरम्यान, सरोगसीच्या व्यापारीकरणामुळे बाळंतपणाचा खेळ होत असल्याचे वेळोवेळी उघड झाले होते. वंध्यत्वाची समस्या असणाऱ्या स्त्रियांसाठी सरोगसी हे एकप्रकारे वरदानच म्हणावे लागेल. सरोगसी कायद्यामुळे याप्रकरणी असलेला तिढा काहीसा सुटताना दिसत आहे.
 

आता मात्रतुम्हीच का गरोदर आम्हीही बरोबरअसे म्हणत पुरुषही स्त्रियांच्या खांद्याला खांदा लावून सोनोग्राफीसाठी असलेल्या रांगेत बसलेले पाहायला मिळतील. जगभरात असे दृश्य जर सर्रास दिसू लागले, तर मग अपत्यप्राप्तीसाठी स्त्रियांची गरजच उरणार नाही. कदाचित लग्नव्यवस्थाही विस्कळीत होईल. तृतीयपंथीयांचे गरोदर राहणे, हा अनैसर्गिक प्रकार आहे, असेही काही लोक म्हणू शकतात. अशाप्रकारे लिंगबदल शस्त्रक्रिया करून मानव निसर्गनियमांच्या विरुद्ध वागत आहे, असेही मत कोणी प्रकट करेल. दुसरीकडे तृतीयपंथीदेखील गरोदर राहू लागले तर त्यांनाही मातृत्वाचे सुख लाभेल. पण मातृत्वाबरोबर येणारी जबाबदारी, ते आईपण, आपले मूल कसेही लुळेपांगळे असले तरी त्याच्याविषयी असणारे जीवापाड प्रेम या साऱ्या भावना त्यांना प्राप्त करता येतील का? हे प्रश्नही उभे ठाकतात.

 

मात्र, असे असले तरी मानवाने आतापर्यंत अगदी चाकाच्या शोधापासून ते आज थेट तृतीयपंथीयाने मूल जन्माला घालण्यापर्यंत केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचाही विचार केला पाहिजे. मानवाच्या गरजा जसजशा बदलत गेल्या तसतसे त्यांना पूर्ण करण्यासाठी तो झटू लागला. चौकसपणे, जिज्ञासूपणे प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा करू लागला. यातूनच कधीकाळी अशक्य वाटणारे किंवा चमत्कारातच, कल्पनारम्य कथांत दिसणारे प्रत्यक्षातही अवतरू शकले. आताचा तृतीयपंथीयाच्या मातृत्वाचा विषयही तोच. अर्थातच यावर निरनिराळी मत-मतांतरे नक्कीच असू शकतात. म्हणूनच अशा या वैज्ञानिक प्रयोगांचे, शोधांचे स्वागत करायचे की, त्यापासून दूर पळायचे हा प्रश्नही निर्माण होतो व त्याचे उत्तर ज्याने त्याने आपापल्या विवेकबुद्धीला स्मरूनच दिले पाहिजे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@