कोकण विकास प्रतिष्ठान आंबा उत्पादक ते ग्राहक अशी थेट सेवा देणारा ‘आंबा महोत्सव’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2019
Total Views |


 
 

मुंबई : कोकणातील आंबा बागायतदारांना यापुढे नव्या युगाची चाहूल घेऊन स्वत:ची विक्री व्यवस्था उभारणे अत्यंत आवश्यक आहे. बाहेरील दुसरा कोणी येऊन आपल्याला भरपूर भाव देईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

यादृष्टीने गेली अनेक वर्षे कोकण विकास प्रतिष्ठान आंबा उत्पादक ते ग्राहक अशी थेट सेवा देणारा आंबा महोत्सव आयोजित करीत आहे. आजपर्यंत अनेक शेतकरी व बागायतदारांनी याचा फायदा करून घेतला आहे. गतवर्षी दादर, विलेपार्ले, ठाणे, बोरिवली व मुलुंड या ठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आणि त्यात सुमारे अडीच कोटी एवढी उत्साहवर्धक विक्री झाली.

यावर्षीही असाच आंबा महोत्सव १० एप्रिल ते २८ मे, या कालावधीत कोकण विकास प्रतिष्ठान मुंबईत दादर, विलेपार्ले, ठाणे, बोरीवली व मुलुंड याठिकाणी आयोजित करणारआहे. आंबा महोत्सव हे नव्या विक्री व्यवस्थेतील पहिले पाऊल आहे. यापुढे अशा आधुनिक विपणन व्यवस्था कोकण विकास प्रतिष्ठान, आंबा उत्पादकांप्रमाणेच दर्जेदार कोकणी पदार्थ उत्पादक व महिला बचत गटांसाठी ही राबवणार आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षी आंबा महोत्सवच्या सभा, रत्नागिरी, देवगड व मुंबई येथे ठेवण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमाची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे.

दिनांक वेळ स्थळ

शुक्रवार, १५ मार्च सकाळी ११ वाजता माळ नाका, रत्नागिरी

शनिवार, १६ मार्च सकाळी ११ वाजता पवनचक्की, देवगड

रविवार, १७ मार्च सायं. ६ वाजता दादर (प.), मुंबई

या सभेस जास्तीतजास्त आंबा बागायतदार व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@