सर्फ एक्सेलच्या जाहिरातीमुळे वाद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : सर्फ एक्सेल कंपनीच्या नव्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. देशभरातून या जाहिरातीला विरोध होत आहे. होळीनिमित्त असलेल्या या जाहिरातीमध्ये लहान मुले होळी खेळताना दाखवली आहेत. कॉलनीमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकावर ही लहान मुले गॅलरीत उभे राहून रंगाच्या पिचकाऱ्या मारत असतात. रंगाने भरलेले फुगे मारत असतात. अशावेळी एक लहान मुलगी सायकल चालवत येते, इतर सगळ्या लहान मुलांकडून ती स्वत:वर रंग उधळून घेते. सगळ्या लहान मुलांकडील रंग संपल्यावर ती मुलगी “सगळं संपल आहे, बाहेर ये” असे एका लहान मुलाला म्हणते.
 

पांढऱ्या शुभ्र कपड्यातील एक मुस्लिम मुलगा घराबाहेर पडतो. त्या मुलाला आपल्या पाठी सायकलवर बसवून ती हिंदू मुलगी मशीदीपर्यंत सोडते. “नमाज पढके आता हूँ” असे तो मुलगा म्हणतो. त्यावर “बाद मे रंग पडेगा” असे ती हिंदू मुलगी त्याला म्हणते. “आपुलकीच्या रंगाने इतरांना रंगवताना डाग लागले, तर डाग चांगले आहेत.” अशी टॅगलाईन या जाहिरातीला देण्यात आली आहे.

 
 
 

हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखविण्याचा प्रयत्न सर्फ एक्सेलच्या या जाहिरातीतून करण्यात आला आहे. परंतु हा प्रयत्न करताना नमाजला होळीपेक्षा जास्त महत्त्व देण्यात आले आहे. असे मत अनेक सोशल मीडिया यूजर्सनी व्यक्त केले आहे. सर्फ एक्सेलच्या या जाहिरातीला सोशल मीडियाद्वारे देशभरातून विरोध केला जात आहे. ट्विटरवर #BoycottsurfExcel हा हॅशटॅग चालवला जात आहे. सर्फ एक्सेल हे हिंदुस्तान यूनिलिव्हरचे उत्पादन असून या पुढे सर्फ एक्सेल वापरू नका. तसेच हिंदुस्तान यूनिलिव्हरची इतर उत्पादनेही वापरू नका असे आवाहन लोकांना सोशल मीडियाद्वारे केले जात आहे. लोव लिंटास या जाहिरात कंपनीचे प्रादेशिक क्रिएटिव्ह अधिकारी कार्लोस परेरा आणि हिंदुस्तान यूनिलिव्हरच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रिया नायर यांना पदावरून हटविण्यात यावे. अशी मागणी सोशल मीडिया यूजर्सकडून करण्यात येत आहे. 

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान यूनिलिव्हरची कुंभमेळ्याविषयीची एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. कुंभमेळा ही वृद्धांना सोडण्याची जागा असल्याचे या जाहिरातीत म्हटले होते. तेव्हादेखील हिंदुस्तान यूनिलिव्हरच्या विरोधात टीकेची झोड उठली होती. हिंदुस्तान यूनिलिव्हरची उत्पादने वापरू नका असे आवाहन तेव्हाही करण्यात आले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@