बारामतीहून आलेली स्क्रिप्ट वाचून दाखवतात राज ठाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : राज ठाकरे हे कलाकार आहेत. त्यांच्या भाषणात ते बारामतीवरून आलेली स्क्रिप्ट वाचून दाखवतात. ते एकही आमदार, नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत, अशी सणसणीत टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मनसेच्या १३ व्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. ते महिला मेळावा कार्यक्रमात मुंबईत बोलत होते. या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजही उपस्थित होत्या.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, राज ठाकरे हा १२ वा गडीही नाही आणि कप्तानही नाही. ते फक्त सुपारी घेऊन भाषण करत आहेत. याउलट मोदी हे सूर्यासारखे आहेत. राज्यात आम्ही ४५ जागा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धारही यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. पुलवामा येथील सीआरपीएफच्या जवानांवरील आत्मघाती हल्ल्यानंतर बालाकोट येथे भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. या मुद्द्यावरुन विरोधकांनी शंका उपस्थित केली होती आणि शनिवारी बोलताना राज ठाकरे यांनीही पुन्हा याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

 

भारतीय जवानांनी हल्ल्यानंतर मृतदेह मोजायला हवे होते का? : सुषमा स्वराज

 

स्वराज पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून विचारल्या जाणाऱ्या एअर स्ट्राईकवरील प्रश्नांवर सुषमा स्वराज यांनी टीका केली. भारतीय सैन्याने हवाई हल्ल्यानंतर मृतदेह मोजायला हवे होते का?, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. काहीजण या मुद्द्याचे राजकारण करत असून अशा पक्षांना तुम्ही मतदान कराल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. तुम्ही आतंकवाद्यांचा पुळका असणार्यांमसह उभे राहाल कि पाकिस्तानसह जाल, असा प्रश्न त्यांनी विचारत विरोधकांवर घणाघात केला. आ. आशिष शेलार यांनी राज यांना टोला लगावला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलायची तुमची कुवत नाही

 

तुमच्या टीकेला आम्ही भीक घालणार नाही, एका जागेसाठी राज ठाकरेंनी असले राजकारण करू नये, असा टोला त्यांनी लगावला. भाजपच्या महिला मेळाव्याबद्दल कौतूक करताना ते म्हणाले कि, इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग यापूर्वी कोणत्याही पक्षात एकत्र आला नव्हता, ही भाजपची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@