आमदार संदीप नाईकांची रेंज रोव्हर फोडली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2019
Total Views |


 

नवी मुंबई : नवी मुंबईतील एका कार्यक्रमात शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी झाली. यामध्ये शिवसेना आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हरची तोडफोड करण्यात आली आहे. ऐरोलीतील महापालिकेच्या सभागृहाचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्ते भिडले. यात आमदार संदीप नाईक यांची गाडी फोडण्यात आली आहे.

 

या घटनेमुळे ऐरोलीत तणावाचे वातावरण आहे. संदीप नाईक यांच्या गाडीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून घणसोली, दिघा, कोपरखैरणे बंद जाहीर करण्यात आला आहे. संदीप नाईक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र आहेत. दरम्यान या प्रकारामुळे नवी मुंबईतील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@