दहशतवाद पोसणे बंद करा ; सुषमा स्वराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण असताना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी)च्या बैठकीमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादावर प्रहार केला. "दहशतवाद वाढत चालला आहे. त्याला वेळेस आळा घालणे गरजेचे आहे. दहशतवादाशी लढाई म्हणजे कुठल्याही धर्माशी लढाई नाही. ती लढाई आहे ती वाईट विचारांशी. असा हा दहशतवाद पूर्ण जगभर पसरत चालला आहे. त्याला पोसणे किंवा त्याला छुपे निधी पुरवणे हे प्रकार थांबवले पाहिजेत." असे परखड मत त्यांनी ओआयसीच्या बैठकीत व्यक्त केले. ५७ इस्लामिक देशांच्या समूहाने ही बैठक आयोजित केली होती.

 

शुक्रवारी पहाटे सुषमा स्वराज या दुबईमध्ये दाखल झाल्या. ओआयसीच्या बैठकीसाठी भारताला विशेष आमंत्रण दिले गेले होते. यामुळे पाकिस्तानने या बैठकीला हजर राहण्यास नकार दिला. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी यांनी सांगितले की, "मी परराष्ट्रीय मंत्र्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार नाही. कारण, भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना 'गेस्ट ऑफ ऑनर' म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे." या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात ही पाकिस्तानला भारताची मोठी चपराक होती. कारण काही दिवसांपूर्वी ओआयसीच्या या बैठकीसाठी पाकिस्तानचे पारडे जड मानले जात होते. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा पूर्ण जगासमोर आला. शिवाय, सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चालल्या घडामोडींमुळे भारताला हा 'गेस्ट ऑफ ऑनर'चा दर्जा मिळाला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@