सीआरपीएफचा जवान शहिद; तिघे जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2019
Total Views |


जम्मू : एकिकडे भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने सुपूर्द करत शांततेचे प्रतिक असल्याचे म्हटले. मात्र, सीमाभागावरील कुरापती काही केल्या थांबण्याचे नाव दिसत नाही. जम्मू काश्मिरच्या हंदवाड्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक सीआरपीएफ अधिकारी शहिद झाला आहे तर अन्य तिघे जखमी झाले आहे.

 

सीमाभागावरील गाव हंदवाडा येथे शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या बेछुट गोळीबारात दोन पोलीस आणि एक अधिकारी शहिद झाले आहेत. एकिकडे पाकिस्तान आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत आहे मात्र, सीमाभागावरील दहशतवाद थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@