६० तासांनंतर कमांडर अभिनंदन भारतात दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय हवाई दलाचे जवान विंग कमांडर अभिनंदन वर्थमान शुक्रवारी रात्री मायदेशात परतले आहेत. भारताच्या हद्दीत अभिनंदन भारताच्या हद्दीत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्याच्या आगमनासाठी सर्व भारताच्या नजरा वाघा बॉर्डरकडे खिळून होत्या. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे पूर्ण कुटुंबीय अटारी-वाघा सीमेवर हजर होते. तसेच, वायू सेनेच्या ५ गाड्या त्याच्या शौर्याला सलाम द्यायला सीमेवर पोहचल्या होत्या. त्याच्या आगमनाने त्याच्या कुटुंबियांसह सर्व देश भावुक झाला होता. सकाळपासूनच अटारी-वाघा सीमेवर नागरिकांची झुंबड होती. वाघा बॉर्डरवर शुक्रवारी बीटिंग रिट्रीट सोहळा देखील रद्द केला होता.

 

गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी अभिनंदन यांना भारताला सोपवणार असल्याची माहिती दिली होती. भारतीय वैमानिकास पाकिस्तानने तत्काळ मुक्त करावे. मात्र, त्यासाठी भारत कोणत्याही प्रकारचा तह पाकिस्तानशी करणार नाही, असा सूचक इशारा भारताने दिल्यानंतर पाकिस्तानला नमावे लागले. दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसातच भारतने दुसरे सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मीर हादरून सोडले. त्यानंतर बुधवारी पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईला घाबरून पाकिस्तानच्या वायुदलाने पळ काढला होता. कारवाईदरम्यान भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान जमिनदोस्त केले. तर, भारतालाही आपला एक विमान गमवावा लागला. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्यामुळे विमानाचे चालक अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@