अमित शाह यांचा पुणे दौरा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे केले कौतुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2019
Total Views |



पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित शक्तीकेंद्र प्रमुख संमेलन पार पडले. यावेळी त्यांनी पुणे, शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघांतील बुथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी व शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

 

शक्तीकेंद्र प्रमुख संमेलनात शाह यांनी भाजप सरकारच्या काळात सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच त्यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार सत्तेवर असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर फोफावला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर राज्यातला भ्रष्टाचार हद्दपार केला. त्याचबरोबर केंद्रात राहुल गांधींच्या परिवाराने ५५ वर्ष सत्ता गाजवली. मात्र नरेंद्र मोदी यांनी जो ५५ महिन्यात देशाचा विकास केला तो राहुल यांच्या परिवाराला ५५ वर्ष जमले नाही.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या मराठी पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात सर्वांनी आणखी सक्षमपणे २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाला बहुमताने विजय करावे असेही आवाहन केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@