अभिमानास्पद; ‘हेलिना’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2019
Total Views |


 


(महा MTB ऑनलाईन) 

ओडिशा : भारताच्या हेलिनाया क्षेपणास्त्राची बालासोर येथील किनारपट्टीवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. हेलिनाहे अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र असून याचा हेलिकॉप्टरवरून मारा करता येणार आहे. नागया रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रीची हेलिनाअत्याधुनिक आवृत्ती आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. हेलिनाच्या यशस्वी चाचणीने लष्कराच्या सामर्थ्यात अधिकची भर पडणार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२.५५ वाजता बालासोर जिल्ह्यातील चांदीपूरमधील चाचणी केंद्रात घेण्यात आली. लष्कराच्या हेलिकॉप्टरवरून घेण्यात आलेल्या या चाचणीत हेलिनाने आपले लक्ष अचूक भेदले. हे क्षेपणास्त्र ७ ते ८ किलोमीटर दूरवरील लक्ष आरामात भेदू शकते. यापूर्वी १३ जुलै २०१५ रोजी राजस्थान येथील जैसलमेर येथे हेलिनाची तीन टप्प्यात चाचणी घेण्यात आली होती. तर मागील वर्षी १९ ऑगस्टला पोखरण येथून हेलिकॉप्टरद्वारे यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@