मुंबई पोलीस करणार ई - सायकलची स्वारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2019
Total Views |



मुंबई - लवकरच मुंबई पोलिसांच्या ताफ्यात ई सायकल येणार आहे. मुंबईतील गजबजलेल्या ठिकाणी, गल्लीबोळात पोलिसांची वाहने जाण्यास अडचण होते. पाकिटमार, साखळी चोरांना पकडण्यासाठी या ई सायकलचा वापर होणार असून या सायकलची चाचणी सध्या नागपाडा एमटी या ठिकाणी सुरू आहे. बॅटरीवर चालणारी या सायकलीचा वेग ४० किमी प्रतितास एवढा आहे. "ही सायकल पोलिसांची तब्येत संभाळण्यासदेखील मदत करेल." असे संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी सांगितले. मागच्या डिसेंबरमध्ये पंजाब पोलिसांनी विद्युतीय सायकलींचा अवलंब करण्यासाठी प्रकल्पाची सुरुवात केली होती.

 

काय आहे ई सायकलची खासियत?

 

- ई सायकलच्या मध्यभागी बॅटरी मोटर बसविण्यात आली आहे. ही बॅटरी एक ते दीड तासांमध्ये चार्ज होते.

- एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल २ ते ३ तास चालू शकते. ३० ते ४० च्या वेगाने ही सायकल ४० ते ४५ किमी चालेल.

- बॅटरी चार्ज संपले तरी ही सायकल पेडलवरही चालवण्यात येऊ शकते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@