भारताचे 'भारत'पण हीच खरी सौम्य शक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2019
Total Views |



दीपककुमार मुकादम यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन

 

मुंबई : भारताचे 'भारत'पण हीच खरी भारताची सौम्यशक्ती असल्याचे मत खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले. कालिना येथील मुंबई विद्यापीठात 'Know Your Legacy' या कार्यक्रमाअंतर्गत खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या 'भारताची सौम्यशक्ती' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दीपककुमार मुकादम यांच्या कार्य अहवालाचे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

मुंबई विद्यापीठाचा इतिहासही भारताच्या सौम्य शक्तीचे दर्शन घडवतो असे खा. सहस्त्रबुद्धे यावेळी म्हणाले. ३० वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका प्राध्यापकाने सौम्य शक्ती ही संकल्पना मांडली होती. युद्ध कालावधीमध्ये तीव्र शक्ती या संकल्पनेच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्या. मात्र, त्यानंतर कालांतराने सौम्य शक्ती ही संकल्पना पुढे आल्याचे ते म्हणाले. भारताच्या सामर्थ्याचा आपण विचार करतो तेव्हा हीच सौम्य शक्ती आपले महत्त्वाचे अंग असल्याचे जाणवते. जेव्हा आपल्या ओळखीचा प्रश्न येतो तिच सौम्य शक्ती आपली ताकद बनते. आपण कोण आहोत किंवा आपली देशाप्रती असलेली आत्मीयता हीच त्या सौम्य शक्तीचे केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

जगभरात भरताप्रती स्नेह

 

आज असा कोणताही देश नसेल जिकडे भारताप्रती स्नेह नाही. यावेळी त्यांनी अफगाणिस्तान असेल किंवा आणखी कोणतेही देश असतील त्या ठिकाणी आपल्याला आलेले अनुभव कथन केले. ओबामा असतील किंवा बिल क्लिटंन यांचे भारतबाबतचे मत भारतात आल्यानंतर बदलले. त्यांच्या विचारांमध्ये फरक पडला. यासाठी भारत अनुभवणे आवश्यक असल्याचे सहस्त्रबुद्धे म्हणाले. भारतील लोकांच्या डोळ्यात इच्छा-आकांक्षा दिसतात. त्या अन्य कुठे अनुभवता येत नाहीत, असे एका जर्मन व्यक्तीने जर्मनीच्या दौर्यावेळी सांगितले असल्याच्या आठवणी देखील त्यांनी सांगितल्या.

 

अध्यात्मिक जनतंत्र महत्वाचे प्रतीक

 

अध्यात्मिक जनतंत्र हे सौम्य शक्तीचे महत्वाचे प्रतीक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आपल्या देशात प्रत्येकाला अध्यात्म निवडीचे स्वातंत्र्य आहे. त्याच्याच आधारावर सामाजिक आणि आर्थिक जनतंत्र सामोरं येते. सौम्य शक्ती हीच भारताच्या यशस्वी होण्यामागील महत्त्वाचे कारण असल्याचे ते म्हणाले. आपली संस्कृती एक आहे पण त्याचे अविष्कर वेगवेगळे आहेत. हे जगाला सांगण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कला परंपरा ही आपल्याला मिळालेली संपदा आहे. त्याचाही अनेकदा अध्यात्माशी सबंध येतो. चित्रपट, खाद्य संस्कृती, योग ही आपली ताकद आहे. आज तेहरानमध्येही उपनिषद शिकवले जातात आणि हे आपले यश आहे. प्रत्येकाने आपली सौम्य शक्ती जगभर पसरवण्यासाठी वेगाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या अनेक गोष्टी आज अनेक देश स्वीकारत आहे. त्यामुळे आपण आपल्या सौम्य शक्तीला आत्मसात करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@