पंतप्रधान मोदी स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत साकारत आहेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2019
Total Views |


 


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण

 

पालघर : माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे वाडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हा पुतळा येथील स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालय प्रांगणात उभारण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत साकारत असल्याचे गौरवोद्गार काढले. ते म्हणले, "स्वामी विवेकानंद यांनी २१ व्या शतकात भारत महासत्ता बनेल असे भाकित वर्तविले होते. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात देश खऱ्या अर्थाने बलशाली बनण्यास सुरुवात झाली आणि आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत भारताला सामर्थ्यशाली करीत आहेत."

 

मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, अटलजी केवळ विचारवंत नव्हते तर त्यांनी देशाला कणखर आणि कल्पक नेतृत्व दिले. भारताला जगात एक गरिबांचा देश, दुर्बल देश समजले जायचे. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली पोखरणचा अणुस्फोट करून अटलजींनी हा समज दूर केला. कारगिलच्या वेळीही आधी मैत्रीचा हात पुढे केला पण पाकिस्तानची आगळीक सुरूच राहिल्याने धडाही शिकविला. संयुक्त राष्ट्रातही त्यांनी भारताची बाजू दमदारपणे मांडली. त्यावेळी ते विरोधी पक्षात असले तरी त्यांनी देशाला पहिले प्राधान्य दिले. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामीजींच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात उभारण्यास सुरुवात केली असून जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये आपला देश लवकरच येईल, अशी खात्रीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

असा आहे पुतळा

 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा ५ फुटाचा असून मकराना येथील संगमरवरी दगडापासून तयार केला आहे. संपूर्ण स्मारक ग्रॅनाईटमध्ये असून एकूण घुमटापासून पायथ्यापर्यंत ११ फूट उंचीचे आहे. घुमटासाठी धोलपूर येथील लाल दगड आणि पायथ्याला दक्षिण भारतातील काळे ग्रॅनाईट मार्बल वापरले आहे. हा सुंदर पुतळा अजमेरच्या कैलास अग्रवाल आणि त्यांच्या कारागिरांनी ३ महिन्यात जयपूर येथे तयार करून वाडा येथे आणला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@