राफेलवरील आरोपांना संरक्षणमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2019
Total Views |


नवी दिल्ली : राफेल कराराला न्यायालयाने क्लिनचिट दिली असताना पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. द हिंदू या वृत्तपत्राने छापलेल्या बातमीचा आधार घेत राहुल यांनी पुन्हा पंतप्रधानांवर आरोप केले आहेत. मात्र, हे आरोप बिनबुडाचे असल्याचे प्रत्युत्तर संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी राहुल गांधींना दिले आहेत.

 
 
 

अहवालात तत्कालीन संरक्षण सचिवांच्या एका नोंदीचा दाखला देत पंतप्रधान कार्यालय या प्रकरणी समांतर चर्चा करत असल्याचे म्हटले आहे. संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आणि सादर केलेला अहवाल एकतर्फी असल्याचे म्हटले. सादर केलेल्या अहवालात तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलेले उत्तर का दाखवले नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

 

शुक्रवारी 'द हिंदूया इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीत राफेल कराराअंतर्गत कागदपत्रे प्रसिद्ध करत संरक्षण मंत्रालय आणि पीएमओ यांच्यात चर्चा सुरू होती. तत्कालीन सुरक्षा सचिव मोहन कुमार यांच्या एका नोटच्या हवाल्याचा दावा करत यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, त्याखाली मनोहर पर्रिकर यांनी लिहीलेली नोट छापलीच नाही.

 

पर्रिकर यांनी या सर्व बाबींचे उत्तर देताना सर्व काही नियमानुसारच झाले असल्याचे म्हटले होते. निर्मला सितारामन यांनी या प्रश्नी संसदेत केंद्र सरकारतर्फे उत्तर दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाने या करारात कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचे त्या म्हणाल्या. संबंधित वृत्तपत्राने लोकांसमोर पूर्ण सत्य ठेवलेच नाही. त्यांनी संरक्षण सचिवांच्या या नोंदीवर संरक्षणमंत्र्यांचे उत्तरही छापायला हवे होते, असे त्या म्हणाल्या.

 

तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या फाईलच्या नोंदणीतील प्रत्युत्तरात हे सर्वकाही नियमानुसारच झाल्याचे म्हटले होते. कॉंग्रेस विदेशी ताकदीच्या आधारे देशाचे नुकसान करू इच्छित आहे. हे एखाद्या मेलेल्या घोड्यावर चर्चा करण्या सारखेच आहे. ते मल्टी नॅशनल कॉर्पोरेशनसोबत खेळत आहेत. राफेल कराराला विरोध करून कॉंग्रेस वायुसेनेला कमकुवत करू पाहत आहे., असे सांगत त्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला.

 

पंतप्रधान कार्यालयाने राफेल कराराची वेळोवेळी माहिती घेतली होती. कॉंग्रेसवर निशाणा साधत त्यांनी सोनिया गांधींवर आरोप केले. त्या म्हणाल्या, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रीय सल्लागार परिषद तयार करण्यात आली होती. यात सोनिया गांधी अध्यक्षा होत्या. ही समिती वारंवार पीएमओमध्ये हस्तक्षेप करत होती आणि पीएमओ चालवत होती.

 

द हिंदूने सादर केलेल्या अहवालात पत्रकारितेची गळचेपी : निर्मला सितारामन

द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने सादर केलेल्या पत्रकात पत्रकारितेच्या सिद्धांतांचीच गळचेपी केली आहे. जर संरक्षण सचिवांची नोंद छापली तर संरक्षणमंत्री यांची नोंद का छापण्यात आलेली नाही. यात पर्रिकरांनी सर्वकाही ठिक असल्याचे म्हणत सही केली आहे. मी संसदेत केंद्र सरकारतर्फे हाच मुद्दा मांडला आहे. पर्रिकर यात स्पष्ट म्हणाले होते कि, चिंता करण्याचे कारण नाही. तुम्ही शांत राहा सर्वकाही ठिक सुरू आहे. वृत्तपत्राने केवळ नोंदीचा काहीभाग प्रकाशित करून दिशाभूल केली आहे.’’, असे सितारामन म्हणाल्या.

 

आम्हाला किमतीशी काही देणेघेणे नव्हतेच : तत्कालीन संरक्षण सचिव

या प्रकरणी तत्कालीन संरक्षण सचिव मोहन कुमार यांनी प्रसिद्ध झालेल्या अहवालाविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्हाला राफेलच्या कराराच्या किमतींविषयी काही घेणे देणे नव्हते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@