मायावतींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2019
Total Views |


 


पुतळ्यांवर केलेला खर्च परत करण्याचे आदेश


नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. मायावती यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात स्मारके आणि पुतळे उभारण्यावर खर्च केलेले सर्व पैसे परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या म्हणजेच २००९च्या एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी हे आदेश दिले आहेत. स्मारके आणि पुतळे उभारण्यावरील प्रकरणाची सुनावणी मे नंतर व्हावी, अशी विनंती मायावतींच्या वकिलाने केली होती. मात्र, न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत या प्रकरणाची पुढील सुनावणी २ एप्रिल रोजी होणार असल्याचे सांगितले.

 

काय आहे प्रकरण?

 

मायावती मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेशमध्ये विविध शहरांमध्ये हत्ती आणि मायावती यांचे अनेक पुतळे उभारण्यात आले होते. यासोबतच मायावतींच्या नावाने अनेक पार्क आणि स्मारके देखील उभारण्यात आले होते. यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासोबत हत्ती, मायावती, कांशीराम यांचे पुतळे उभे केले होते. यासाठी जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला होता. दरम्यान, यावर आक्षेप घेत २००९ साली एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

 
   हे वाचलत का?
 
 
 

न्यायालायची भूमिका काय?

 

२००९ साली दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्या. रंजन गोगई म्हणाले, बसप प्रमुख मायावती यांनी जनतेच्या पैशातून मुर्त्यांवर केलेला खर्च हा अयोग्य असून मायावतींनी तो परत करावा. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ एप्रिल रोजी होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@