गुगलचे आजचे डुडल पाहिलेत का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2019
Total Views |


 

मुंबई : विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीचा गुगल आपल्या डुडलद्वारे सन्मान करत असत. त्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला आणि जयंतीला गुगल डुडल तयार करते. आजदेखील गुगलचे खास डुडल आपले लक्ष वेधून घेत असून एक महिला हातात कॉफीचा मग घेऊन उशी असून आजूबाजूला रासायनिक संज्ञा व समीकरणे आहेत.मात्र ही व्यक्ती कोण? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल.

 

जगप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ फ्रेडलिब फर्डिनेंड रंज यांना गुगलने अभिवादन केले आहे. त्यांनी १८१९ साली कॅफिनचा शोध लावला होता. आज त्यांचा २२५ वी जयंती आहे. त्यामुळे गुगलने फ्रेडलिब यांच्या कार्याची दखल घेत हे खास डुडल तयार केले आहे. कॅफिनसोबतच त्यांनी अनेक शोध लावले आहेत. फ्रेडलिब यांचा जन्म ८ फेब्रुवारी १७९४ रोजी जर्मनीमध्ये झाला तर २५ मार्च १८६७ मध्ये वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@