पवार साहेब बारामतीतून लढा : चंद्रकांतदादा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2019
Total Views |
 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार या चर्चेवर प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकी माढा मतदारसंघातून शरद पवार यांना हरण्याचा दावा केला. त्यांनी शरद पवार यांच्यासाठी बारामती हा सुरक्षित मतदार संघ असल्याचेही सांगून टाकले.

 

लोकसभा निवडणुकीसाठीच्या राष्ट्रवादीच्या जागांवरील इच्छुकांची शुक्रवारी पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये बैठक झाली. बैठकीत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला आहे. शरद पवार यांनी विचार करणार असल्याचे सांगितले आहे.

 

यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चां रंगल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांना माढा मतदारसंघात हरवणार असल्याचे म्हटले. माढा मतदारसंघात भाजपने संघटना मजबूत केली असल्याचेही ते म्हणाले. शरद पवार यांच्यासाठी बारामती हाच मतदार संघ आहे. त्यांनी तिथूनच निवडणूक लढवावी, असे म्हटले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@