वीरेंद्र सेहवाग भाजपकडून निवडणूक लढविणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |



हरियाणातील रोहतक मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची चर्चा


चंदीगड : देशात २०१९च्या लोकसभेचे वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्ष मतदारसंघातून लोकप्रिय उमेदवार देण्याच्या मूडमध्ये आहे. यासाठी सगळीकडेच शोधाशोध चालू असून, खेळ, चित्रपट, संगीत क्षेत्रातील दिग्गजांना उमेदवारी देण्यासाठी सर्व पक्षीयांकडून कंबर कसली जात आहे. अशातच भारतीय क्रिकेटचा माजी दिग्गज खेळाडू मुलतान का सुलतान म्हणून बिरुद मिरवणारा वीरेंद्र सेहवाग भाजपकडून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. हरियाणातील रोहतक मतदार संघातून सेहवाग निवडणूक लढवू शकतो अशी चर्चा आहे.

 

रोहतक मतदारसंघात सध्या काँग्रेसचे प्राबल्य असून येथे दीपेंद्र सिंह हुड्डा हे खासदार आहेत. हुड्डा याच्यावर मात करण्यासाठी भाजपकडून सेहवाग याचे नाव पुढे केले जात आहे. मात्र, भाजपचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष सुभाष बराला यांनी याबाबत कोणताही दुजोरा दिला नाही. सेहवागने अजून भाजपात प्रवेशच केला नसल्याचे कारण देत ही चर्चा खोटी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच गौतम गंभीर व सूफी गायक हंसराज हंस हे देखील भाजपकडून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@