चहा पिणारे लोक असतात सर्वाधिक क्रिएटिव्ह!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |


 


चीनमधील पेकिंग विद्यापिठामधील एका संशोधनाचा निष्कर्ष

 

नवी दिल्ली : चहाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवसभरात अनेकदा चहा प्यायल्यास क्रिएटीव्ह विचार डोक्यात येतात असे एका संशोधनातून समोर आले आहे. चीनमधील पेकिंग विद्यापिठामधील एका संशोधनानंतर हा निष्कर्ष मांडण्यात आला. या संशोधनामधील सर्व निष्कर्ष फूड क्वॉलिटी अॅण्ड प्रेफरन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

 

संशोधकांचा निष्कर्ष काय?

 

फूड क्वॉलिटी अॅन्ड प्रिफरेंस जर्नलमध्ये प्रकाशित या संशोधनानुसार चहामधील कॅफीन आणि थेनीनमुळे चहा पिणारा व्यक्ती सतर्क सावधान, एकाग्र आणि सजग राहतो असे म्हटले आहे. संशोधनानुसार एक कप चहा पिल्यानंतर काही वेळातच मेंदूमध्ये रचनात्मक रसाचा प्रवाह जाणवतो. ही प्रक्रिया क्रिएटीव्ह काम समजून घेण्यासाठी मदत करते. त्यामुळे व्यक्तीची क्रिएटीव्हिटी अधिक वाढते असे म्हटले आहे.

 

कसा काढला निष्कर्ष?

 

या संशोधनासाठी मानसोपचारतज्ञांनी सरासरी २३ वर्ष वयोगट असणाऱ्या ५० विद्यार्थ्यांचे दोन वेगवेगळे गट निवडले. या दोन्ही गटांमधील एका गटातील विद्यार्थ्यांना कोरा चहा प्यायला दिला तर दुसऱ्या गटातील मुलांना पाणी पिण्यास दिले. यानंतर या दोन्ही गटांना काही ठोकळे देऊन त्यापासून क्रिएटीव्ह इमारतींची रचना तयार करण्यास सांगितले. यानंतरच्या निष्कर्षावरून मानसोपचारतज्ञांनी असा निष्कर्ष काढला की, चहा पिणारे लोक अधिक क्रिएटिव्ह असतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@