योगी सरकारकडून गोमाता कल्याणासाठी पाचशे कोटींची तरतूद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |


लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प गुरुवारी सादर केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प लाख ७० हजार ६८४ कोटींचा आहे. गेल्यावर्षी अर्थात २०१८-१९ च्या तुलनेत यावर्षीचा अर्थसंकल्प १२ टक्क्यांनी जास्त असून अर्थसंकल्पात गोमाता कल्याणासाठी योगी सरकारने ५०० कोटींहून अधिकची तरतूद केली आहे.

 

योगी सरकारच्या या अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांसह सर्वांचाच विचार केला गेलेला आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सामावेश यात करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात विजेचे समान वितरण केले जाणार असल्याचे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.

 

उत्तर प्रदेशातल्या भटक्या जनावरांच्या देखरेखीसाठी १६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील गोशाळेच्या दुरुस्ती आणि निर्माणासाठी २८४ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. शहरी भागातील कान्हा गोशाळा आणि आवारा पशू शेल्टर योजनेसाठी २०० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.

 

 
 

अयोध्येमधील प्रमुख पर्यटन स्थळांच्या एकीकृत विकासासाठी १०१ कोटींची तरतूत केली आहे. संस्कृत भाषेच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी संस्कृत शाळांना मदत म्हणून २४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अनुदानित संस्कृत विद्यालय आणि पदवी महाविद्यालयांना अनुदान प्रदान करण्यासाठी ३० कोटी दिले जाणार आहे.



 
 
 

२०१९-२० मध्ये एक्स्प्रेस वे साठी ३१९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील बंद चीनी मिलसाठी ५० कोटी रुपये आणि पीपीपी तत्त्वावर चालवण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@