“‘रॉकी’ हा सिनेमा अॅक्शनपट असल्याने मराठी सिनेसृष्टीतील माझे पदार्पण दमदार होणार आहे. यापेक्षा दुसरी कोणतीच आनंदाची आणि समाधानाची गोष्ट माझ्यासाठी नाही.” असे संदीपने म्हटले. हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता राहुल देव ‘रॉकी’ या सिनेमामध्ये खलनायक साकारला आहे. ‘रॉकी’च्या निमित्ताने राहुल देव यांनी पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम केले आहे. ‘रॉकी’ या सिनेमात नायिका म्हणून नवोदित अभिनेत्री अक्षया हिंदोळकर प्रेक्षकांसमोर येणार आहे. अक्षयाचादेखील हा पदार्पणातील सिनेमा आहे. अशोक शिंदे, यतीन कार्येकर, प्रदीप वेलणकर, क्रांती रेडकर, विनीत शर्मा, गणेश यादव, दीप्ती भागवत, स्वप्नील राजशेखर या कलाकारांच्यादेखील ‘रॉकी’ सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत. येत्या ८ मार्च रोजी ‘रॉकी’ हा प्रदर्शित होत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/