रॉबर्ट वढेरांची पुन्हा एकदा ईडीची वारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |



नवी दिल्ली - आर्थिक व्यवहारात अफरातफर केल्याप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची गुरुवारी पुन्हा ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. बुधवारी त्यांची याच प्रकरणी तब्बल ५ तास चौकशी करण्यात आली होती. वढेरा यांच्यावर अवैधरित्या विदेशात संपत्ती विकत घेतल्याचा आरोप आहे. रॉबर्ट वढेरा काँग्रेस नेत्या सोनिया गांधीचे जावई आहेत. ईडीच्या दक्षिण दिल्लीतल्या कार्यालयात उपसंचालक राजीव शर्मा आणि ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली.

 
लंडनच्या ब्रायनस्टन स्क्वेयर परिसरातील १७.६१ कोटी रुपयांची जमीन वढेरा यांनी पैशांची अफरातफर करुन खरेदी केलाचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. यावेळी रॉबर्ट वढेरा यांनी आपली लंडनमध्ये कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा केला. शिवाय या व्यवहारात आपण सहभागी नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाकडून वाड्रा यांना याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. शिवाय चौकशी दरम्यान सहकार्य करण्याचे आदेश दिले आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@