खुशखबर ; आरबीआयने केली व्याजदरामध्ये कपात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |



नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) मौद्रिक नीती समितीच्या बैठकीत 'रेपो रेट'मध्ये कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी (बीपीएस) कपात केली आहे. ज्यामुळे आता रेपो रेट ६.५ टक्क्यांवरुन कमी होऊन ६.२५ टक्के झाला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्ज स्वस्त होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे गृहकर्ज तसेच इतर कर्ज स्वस्त होण्याचा अंदाजही वर्तविला जात आहे. नवनियुक्त आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच समिक्षा बैठक आहे. १२ डिसेंबर रोजी दास यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा पदभार सांभाळला होता.

 

आरबीआयनुसार, २०१९-२०मध्ये देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) दर ७.४ टक्के राहू शकतो. तर महागाईचा दर २०१९-२० मध्ये पहिल्या तिमाहीत ३.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ३.४ टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत ३.८ टक्के राहू शकतो. आरबीआयने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता हमीविना शेतकऱ्यांना १.६० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. आधी ही मर्यादा १ लाखापर्यत होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@