'मोदी/दीदी = मोदी', हिसाब बराबर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |


 


मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीबीआय प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. ममता अनेकदा भाजप नेत्यांना बंगालमध्ये प्रचार करण्यापासून थांबवत आहेत. यावर परेश रावल यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. परेश रावल यांनी एक ट्विट करत गणितातील एक सूत्र लिहिले आहे. जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

 

"मोदी/दीदी = मोदी, हिशोब बरोबर." असे ट्विट करत रावल यांनी ममता यांना चांगलाच टोला लगावला आहे. त्यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मोदी आणि ममता यांच्यात लढाई झाली तर ममता यांचे काहीही राहणार नाही, असे रावल यांनी अप्रत्यक्षरित्या आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.

 
 
 

शारदा चीट फंड घोटाळय़ाच्या प्रकरणात कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी पाच सीबीआय अधिकाऱ्यांची टीम पोहोचली होती. ज्यानंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात हल्लाबोल करत धरणे आंदोलन सुरु केले होते आणि पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर अजित डोवाल काम करत असल्याचे सांगितले जात होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@