पुन्हा एकदा नमो !!!; आता हर घर 'मोदी ब्रॅण्ड'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |
 
 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची युवा वर्गातील लोकप्रियता आणि मोदी लाट कायम असल्याचा अंदाज भाजपच्या अधिकृत ट्विटरवरूनच दिसून येईल.  भाजपने पुन्हा एकदा नमो मिशन सुरू केले असून त्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भाजपने आता मोदींचा मुखवटा विकण्यास सुरुवात केली असून याला युवा वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

 
 
 
 
 

भाजपने ट्विट केलेल्या पोस्टद्वारे तुमच्यातल्या मोदी चाहत्याला व्यक्त होण्याची संधी द्या, असे आवाहन याद्वारे केले आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा मोदींसारखा हुबेहुब दिसणारा मुखवटा खरेदी करायचा असेल, तर त्यासाठी २७५ रुपये मोजावे लागतील आणि तीन मुखवट्यांचा सेट खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत ६९९ रुपये आहे.

 
 
 

मोदींची लोकप्रियता पाहता या मुखवट्यांना देशभरातून मोठी मागणी आहे. नमो अॅपद्वारे नरेंद्र मोदींचे फोटो आणि घोषवाक्य असणाऱ्या विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये कॉफी मग, टी-शर्ट , टोपी आदी गोष्टींचा सामावेश आहे. गेल्या तीन महिन्यांत नमो अॅपद्वारे ५ कोटींच्या वस्तूंची विक्री झाली आहे.

 
 
 
 
 

भाजपने पुन्हा एकदा नमोया मोहिमेअंतर्गत गेल्या ९० दिवसांमध्ये या अॅपवरून १५ लाख ७५ हजार वस्तू विकल्या आहेत. लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये या वस्तूंची जास्त मागणी असल्याचे कळते.

 
 

पेटीएम, अॅमेझॉनवरही नमो ब्रॅण्ड

 

डिजीटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर पेटीएम, अॅमेझॉन आदींसारख्या ऑनलाईन वेबसाईटवरही अशा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

 
 

नमो हुडी चॅलेंज

 

भाजप खासदार आणि कार्यकर्त्यांनी नमो हुडी चॅलेंज सुरू केले आहे. सोशल मीडियावर अशा पोस्ट आणि हॅशटॅग व्हायरल होत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीसारख्या नेत्यांनी नमो ब्रॅण्डच्या वस्तू घेण्याचे आवाहन केल्याने या मोहिमेला आणखी बळ मिळत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@