राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |



नाटक विभागासाठी रवी पटवर्धन तर मराठी चित्रपटासाठी उषा नाईक यांची निवड


मुंबई : यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा झाली आहे. एकूण १२ जणांना विविध गटात हा पुरस्कार जाहीर झाला. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यामध्ये नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, कीर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रांचा समावेश असून १ लाख रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरुप या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

नाटक विभागासाठी रवी पटवर्धन, कंठसंगीतासाठी, माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीतासाठी श्याम देशपांडे, मराठी चित्रपटासाठी उषा नाईक, कीर्तनासाठी ह.भ.प.विनोदबुवा खोंड, शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी माणिकबाई रेंडके, आदिवासी गिरीजनसाठी वेणू बुकले, वाद्यसंगीतासाठी पं.प्रभाकर धाकडे, तमाशासाठी चंद्राबाई अण्णा आवळे, लोककलेसाठी मोहन कदम आणि कलादानसाठी श्रीकांत धोंगडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान, पुरस्कार प्राप्त सर्व कलाकारांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@