नोएडामध्ये रुग्णालयाला आग ; २४ जण अडकल्याची भीती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |



नोएडा : नोएडा येथील सेक्टर १२ मधील मेट्रो रुग्णालयात भीषण आग लागली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रुग्णालयात जवळपास २४ लोक अडकले असल्याची शक्यता आहे. जीव वाचविण्यासाठी लोक रुग्णालयाचे काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

रूग्णालयाच्या इमारतीत आग लागल्यानंतर तेथील रूग्णांमध्ये मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रूग्णालयाच्या काचा फोडून रूग्णांना बाहेर काढले. दरम्यान, या आगीत कोणतीही दुर्घटना झाल्याचे वृत्त नाही. दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आग लागली त्यावेळी काही रूग्णांवर शस्त्रक्रिया सुरू होती. परंतु आग लागल्याचे समजताच त्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच गंभीर रूग्णांना बाहेर काढून त्यांना दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@