गणपतीपुळे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १० कोटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |



आमला, नागरवाडी, नरसी नामदेव तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासदेखील मंजुरी

 

मुंबई : गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणातील तीर्थक्षेत्र गणपतीपुळेच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मान्यता दिली. या आरखड्यातील कामांसाठी यंदा सुमारे १० कोटींचा निधी मिळणार आहे. यामध्ये रस्ते विकास, वाहनतळ, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजना, सुशोभिकरण, वाहनतळ व मंदिर परिसरात सौर ऊर्जा आदी कामे प्रस्तावित केली आहेत. ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


गणपती पुळे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राचे आयकॉन आहे. येथे येणाऱ्या भाविकांना चांगली सुविधा मिळावी तसेच मंदिराचा परिसर स्वच्छ असावा, यासाठी सजग राहावे. असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गणपती पुळेसोबतच आमला, नागरवाडी, नरसी नामदेव या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास शिखर समितीने मंजुरी दिली. संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आमलासाठी ६.७९ कोटी, श्री संत गाडगेबाबा यांचे अंतिम श्रद्धास्थान नागरवाडीसाठी १८ कोटी आणि हिंगोलीतील श्री संत नामदेव संस्थानसाठी १५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@