खुशखबर! महिलांसाठी 'हिरकणी महाराष्ट्राची' स्पर्धा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |



मुंबई : कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत 'हिरकणी महाराष्ट्राची' ही स्पर्धा घेतली जाणार आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाणार असल्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले. हिरकणी महाराष्ट्राची या स्पर्धेमुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याचे पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.

 

'हिरकणी महाराष्ट्राची' या स्पर्धेची सुरुवात लातूर आणि चंद्रपूर येथून होणार आहे. आरोग्य सुविधा, शेती, तंत्रज्ञान, सामाजिक प्रभाव, संतुलित विकास आणि पर्यावरण अशी क्षेत्रे हिरकणी महाराष्ट्राची स्पर्धेसाठी निवडण्यात आली असल्याचे संभाजी पाटील- निलंगेकर यांनी सांगितले.

 

काय आहे हिरकणी महाराष्ट्राची स्पर्धा

 

हिरकणी महाराष्ट्राची या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील बचतगटांच्या सदस्यांना, महिलांच्या कल्पनांना कौशल्य प्रशिक्षणातून व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रत्येक तालुका जिल्हास्तरावर हिरकणी कॅम्पचे आयोजन करुन महिला उद्योजक, बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हक्काचे व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एका हिरकणीची तर निवडलेल्या सर्व जिल्ह्यांच्या हिरकणींमधून राज्यस्तरीय हिरकणीची निवड करण्यात येईल. यासाठी पहिल्या टप्प्यात महिलांना अडीच कोटी रुपये दिले जाणार आहेत. स्टार्ट अप क्वॉलिटीप्रमाणे प्रत्येक तालुक्यात याबाबत प्रशिक्षण घेतले जाणार आहे. त्यानंतर हा प्लॅन सादर करण्यासाठी १०० बचतगटांना ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. २५ हजार रुपये प्रत्येक खात्यावर पहिल्या १० बचत गटांना देण्यात येणार असून, असे जिल्ह्यातील १०० बचत गटांना पैसे दिले जाणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावरील १० बचत गटांना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@