विश्व हिंदू परिषदेचा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |



पुढील चार महिने राम मंदिराविषयी आंदोलन करणार नाही


नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराविषयी मोठा निर्णय घेतला आहे. पुढील चार महिने म्हणजे २०१९ची लोकसभा निवडणूक संपेपर्यंत राम मंदिर बांधण्यासाठी कोणतेही आंदोलन होणार नसल्याची घोषणा केली आहे. याबाबतची घोषणा व्हीएचपीचे आंतराराष्ट्रीय संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात केली. निवडणुकांच्या काळात राजकीय वातावरण चांगले राहावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे जैन यांनी सांगितले.

 

काय म्हणाले सुरेंद्र जैन?

 

दिल्लीतील एका कार्यक्रमात जैन म्हणाले की, व्हीएचपी १९८४ पासून राम मंदिराच्या निर्माणासाठी संघर्ष करत आली आहे. मात्र, यादरमायन आमच्यावर आजपर्यंत एका विशिष्ट राजकीय पक्षाला मदत करतो असा आरोप होत आला आहे. याचमुळे आमच्यावरील हा शिक्का पुसण्यासाठी विश्व हिंदू परिषद पुढील चार महिने राम मंदिरासंबंधित कोणताही विषय हाती घेणार नाही. यामुळे निवडणुकांच्या काळात देशातील राजकीय वातावरण चांगले राहील व आमच्यावर कोणी आरोप करणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@