औरंगजेबच्या हत्येप्रकरणी ३ जवान ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |



औरंगजेबविषयीची माहिती दहशतवाद्यांना पुरवल्याचा आरोप

 

नवी दिल्ली : गेल्यावर्षी जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे जवान औरंगजेब यांचे अपहरण करून हत्याप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. औरंगजेबच्या हत्येप्रकरणी ४४ राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांना ताब्यात घेतले आहे. अबिद वानी, तजमूल अहमद आणि अदिल वानी या तिघांना भारतीय सैन्याच्या एका विशेष पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर औरंगजेबविषयीचा तपशील उघड केल्याचा संशय आहे.

 

भारतीय सैन्याने ताब्यात घेतलेल्या या तिघांनी दहशदवाद्यांना औरंगजेबविषयीची माहिती दिली होती. याच माहितीच्या आधारे दहशतवादी औरंगजेबपर्यंत पोहचले व त्याचे अपहरण करून हत्या केल्याचा भारतीय सैन्याचा आरोप आहे. या तीन पैकी एक जवान हा कुलगाम तर दोन जण पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

 

४४ राष्ट्रीय राइफल्सचा जवान औरंगजेब मागीलवर्षी जूनमध्ये ईदसाठी घरी जात असताना दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी समीर टायगरला भारतीय जवानांनी एका चकमकीत ठार केले होते. या टीममध्ये औरंगजेबदेखील होता. याचमुळे त्याचे अपहरणकरून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. औरंजेबने देशासाठी बलिदान दिल्याने मागील वर्षी त्याला मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@