म्हाडाच्या ४ हजार ५०० घरांची सोडत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |

 

मुंबई : म्हाडाच्या ४ हजार ५०० घरांसाठीच्या सोडतीची जाहीरात १२ फेब्रुवारीला निघणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ही सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. मार्चमध्ये ही सोडत निघणार असून पुण्यासारख्या शहरात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही संधी आहे.
 

पुण्यातील महाळुंगे या भागातील चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीमध्ये सुमारे २ हजार ५०० घरे पूर्ण तयार आहेत. यापूर्वी त्यासाठी तीन वेळा सोडत काढण्यात आली पण त्या घरांना फारसा प्रतिसाद लाभलेला नाही, त्यामुळे पुन्हा नव्याने सोडतीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

पिंपरी चिंचवड परिसरात सुमारे एक हजार घरे आहेत. खासगी विकासकांनी दिलेले २० टक्के योजनेतील सुमारे एक हजार घरे या सोडतीत आहेत. सर्व मिळून ४ हजार ५०० घरे पुणे मंडळाकडे उपलब्ध आहेत. अंदाजे १२ फेब्रुवारी २०१९ या तारखेला घरांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यापूर्वी पुणे मंडळाने पुणे विभागातील विविध वसाहतींमध्ये ३,१३९ घरांची तसेच २९ भूखंडविक्रीसाठीची सोडत काढली होती. त्यापाठोपाठ ८१२ घरांसाठीही ऑनलाईन सोडत काढली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@