मराठमोळ्या स्मृती मंधानाचा 'डबल धमाका'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |


 


दुबई : मराठमोळ्या स्मृती मंधानाचा महिला क्रिकेट विश्वात आपला धमाका चालूच ठेवला आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या महिला क्रिकेटपटूंच्या एकदिवसीय क्रमवारीत मराठमोळ्या स्मृती मंधानाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती. यामुळे ती चर्चेत आली होती. मंधानाने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली असून सर्वात जलद अर्धशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान तिने मिळविला आहे.

 

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात तिने २४ चेंडूत वादळी अर्धशतक ठोकले. यात ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. कोणत्याही भारतीय महिला क्रिकेटपटूने झळकावलेले हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात स्मृतीने ५८ धावा काढल्या. या आधीचे सर्वात जलद अर्धशतकदेखील तिच्याच नावे असून २५ चेंडूत तिने हे अर्धशतक झळकावले होते. इतकेच नव्हे तर भारतीय महिला खेळाडूचे ५ सर्वात जलद अर्धशतकेदेखील तिच्याच नावावर आहेत.

 
दरम्यान, स्मृती मंधानाच्या धडाकेबाज खेळाची सर्वत्र चर्चा असतानाच तिचा मानाच्या फोर्ब्स यादीत स्थान मिळाले आहे. फोर्ब्सच्या भारतातील अंडर ३०मध्ये मंधानाचा समावेश झाला आहे. 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@