शबाना आझमी आणि जावेद अख्तर पाकिस्तानला जाणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : अभिनेत्री शबाना आझमी आणि त्यांचे पती जावेद अख्तर हे दांपत्य पाकिस्तानला जाणार आहे. पाकिस्तानच्या कराचीमधील आर्ट्स काऊन्सिलने एका कार्यक्रामासाठी दिलेले आमंत्रण या दांपत्यांने स्वीकारले आहे. अभिनेत्री शबाना आझमी यांचे वडील कैफी आझमी हे सुप्रसिद्ध कवी होते. कैफी आझमी यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
 

आम्ही कैफी आझमी यांची मुलगी शबाना आझमी आणि त्यांचे पती जावेद अख्तर यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले आहे. तसेच भारतातील काही महत्वाच्या व्यक्तींनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. अशी माहिती कराची येथील आर्ट्स काऊन्सिलच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. पदाधिकाऱ्याने दिलेल्या या माहितीनुसार शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे.

 

येत्या २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम पाकिस्तानमध्ये होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान शबाना आझमी आणि जावेद अख्तर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. आमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. भारतातील सुप्रसिद्ध लेखक, कवी आणि कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाकिस्तमध्ये येऊन येथील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडणार याची आम्हाला खात्री आहे.अशी माहिती आर्ट्स काऊन्सिलचे सचिव प्राध्यापक एजाज फारुखी यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@