टी-२० मध्ये भारताचे न्यूझीलंडसमोर लोटांगण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |


 


वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंडच्या पहिला टी-२० सामन्यांमध्ये भारताला पराभव सहन करावा लागला आहे. न्यूझीलंडच्या २२० धावांचा पाठलाग करताना भारताची दैना झाली. महेंद्र सिंग धोनीच्या ३९, शिखर धवनच्या आणि विजय शंकरच्या २७ धाव सोडल्या तर इतर कोणत्याही फलंदाजांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. न्यूझीलंडकडून टिम साउथीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर टीम सेफर्टच्या ८४ धावांच्या खेळीने २१९ पर्यंत मजल मारली.

 

न्यूझीलंडने दिलेल्या २२० धावांचा पाठलाग करताना भारताच्या एकही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. कर्णधार रोहित शर्मा अवघी १ धाव करून बाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी धावणे विजय शंकरच्या साथीने ३३ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु तोही अपयशी ठरला. त्यानंतर धोनीने धुरा सांभाळली पण सोबतीला एकही फलंदाजाने साथ दिली नाही. त्यामुळे त्याची एकाकी झुंज भारताला विजय मिळवून देण्यास असमर्थ ठरली. धोनी आणि कृणाल पांड्याने सातव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. तरीही, अखेर भारत १३९ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून टिम साउथीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर सँटनर, फर्ग्युसन आणि इश सोधी यांनी प्रत्येकी २ विकेट काढल्या.

 

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड तडाखेबाज फटाके लावत २२० धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये टीम सेफर्टने ४३ चेंडूंमध्ये ८४ धावांची महत्वाची खेळी केली. तर कर्णधार केन विल्यमसन याने ३४ आणि कॉलिन मुनरो याने ३४ धावांची खेळी केली. भारताला विजयासाठी २२० धावांची गरज लक्ष्य दिले होते. भाराकडून हार्दिक पांड्याने २ विकेट तर, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, खलील अहमद यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@