राष्ट्रपती भवनातील हिरवळ सामान्यांनाही अनुभवता येणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : देश-विदेशातील नागरिकांचे आकर्षणस्थळ असलेले राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन बुधवारपासून नागरिकांना पाहण्यासाठी खुले होत आहे. गार्डनला ६ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान पर्यटकांना भेट देता येणार आहे. या गार्डनमध्ये निळा, लाल, गुलाबी, काळा, पिवळा, पांढरा, हिरवा, अशा विविध रंगांच्या १३५ जातींचे गुलाब आणि ७० जातींचे फुले पाहायला मिळतात.

 

दरवर्षी या गार्डनमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. यामुळे पर्यटाकांची गैरसोय होते. यावर उपाय म्हणून गार्डन प्रशासनाने ऑनलाईन तिकीटांचा पर्याय पर्यटाकांसाठी सुरू केला आहे. पर्यटकांना आता rashtrapatisachivalaya.gov.in या संकेतस्थळावरून तिकीटे बुक करता येणार आहे. ऑनलाईन बुकींगचा लाभ घेण्यासाठी पर्यटकांना ७ दिवसआधी बुकींग करावी लागणार आहे. मुगल गार्डन ६ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. दरम्यान ११ मार्चला सैनिक, पोलीस, दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी गार्डन खुले राहणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@