इस्त्रोच्या जीसॅट-३१ उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) ४०वे संदेशवाहक उपग्रह जीसॅट- ३१ चे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहचे प्रक्षेपण बुधवारी पहाटे २.३०च्या सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून करण्यात आले. प्रक्षेपणाच्या ४२ व्या मिनिटानंतर सुमारे ३ वाजून १४ मिनिटांनी हा उपग्रह जिओ-ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थापित झाला. या उपग्रहाचे प्रक्षेपण युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन-५ रॉकेटने करण्यात आले. जीसॅट- ३१ या उपग्रहाचे वजन २५३४ किलोग्रॅम असून तो पुढील १५ वर्ष कार्यरत राहणार आहे. यामुळे भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता वाढवेल. दरम्यान जीसॅट- ३१ याआधीच्या इनसॅट - ४ सीआर उपग्रहाची जागा घेणार आहे. इनसॅट - ४ सीआर उपग्रहाचा कार्यकाळ संपला असून लवकरच हा उपग्रह निकामी होईल.

 
 
 

"जीसॅट-३१ हा अद्वितीय असा उपग्रह असून यामुळे भारतीय भूप्रदेश आणि बेटांवरील भागात दूरसंचार सेवा पुरविण्यास मदत होणार आहे." असे इस्रोचे चेअरमन डॉ. के. सिवन यांनी सांगितले आहे. "गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इस्रोने सर्वाधिक वजनदार जीसॅट-११ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्याचे वजन ५ हजार ८५४ किलो होते. आता जीसॅट-३१च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोने जीसॅट-३० च्या प्रक्षेपणाची तयारी सुरू केली आहे. हा उपग्रह येत्या जून-जुलै दरम्यान प्रक्षेपित केला जाणार आहे." असे इस्त्रोने सांगितले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@