अपनी बात राहुल के साथ; काँग्रेसची नवी प्रचार मोहीम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |



नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून प्रत्येक पक्षाकडून निवडणूक जिंकण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी अनेक राजकीय रणनीती आखल्या जात आहेत. अशाच प्रकारची एक रणनीती काँग्रेस पक्षाकडून आखली जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाचा मुख्य चेहरा होण्यासाठी काँग्रेसकडून अनेकवेळेस प्रयत्न झाले आहेत. असाच एक प्रयत्न काँग्रेसने भाजपच्या 'चाय पे चर्चा, मन की बात आणि भारत की बात, मोदी के साथ' या कार्यक्रमाच्या धर्तीवर आखला आहे.

 

काँग्रेसने याला अपनी बात राहुल के साथ हे नाव दिले आहे. याचा एक व्हिडीओदेखील राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये राहुल काही विद्यार्थ्यांसमवेत चर्चा करताना दिसून येत आहेत.

 

'अपनी बात राहुल के साथ' या संपर्क अभियानाअंतर्गत राहुल देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांना भेटून त्यांच्याशी त्यांच्या संबंधित मुद्यांवर चर्चा करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे संपर्क फॉर समर्थन या कार्यक्रमाच्या धर्तीवर हा कार्यक्रम असल्याने काँग्रेस भाजपच्या प्रचार अजेंड्याची कॉपी करत असल्याची सोशल मीडियामधून खाल्ली उडवली जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@