हिंदीतील विनोदवीर पप्पू पॉलिस्टर यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : बॉलीवूड जगतातले प्रसिद्ध अभिनेते, विनोदवीर सईद बदर-उल हसन खान उर्फ पप्पू पॉलिस्टर यांचे ५ फेब्रुवारीला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. गेल्या पाच दिवसांपासून ते अंधेरीतील रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना १९९०मधील प्रसिद्ध मालिका 'स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान'मध्ये म्हैसूरच्या महाराजांची भूमिकाही साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.

 

पप्पू पॉलिस्टर यांचे अभिनय आणि विनोदाचे टायमिंग वाखाण्याजोगे होते. अजूनही 'ओम नम: शिवाय' मालिकेत त्यांची नंदीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्‍याचबरोबर, त्यांनी 'दरमियान : इन बिटवीन,' 'इत्तेफाक,' धुंद-द फॉग' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच, 'जोधा-अकबर', 'फिर भी दिल है हिन्दुस्तानी' चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. सईद बदर-उल हसन खान हे गेली २५ वर्ष या क्षेत्रात कार्यरत होते. अनेक मालिका, चित्रपट, जाहिरांतीमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचे कसब दाखवले आहे. अभिनयाव्यतिरिक्त ते शास्त्रीय नर्तकही होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@