विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारी पासून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |



मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन २०१९ चे पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन येत्या २५ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. आज विधानसभा व विधान परिषदेची कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली त्यात विधिमंडळाच्या कामकाजाची चर्चा करण्यात आली.

 

अधिवेशनाचे कामकाज दि. २ मार्च २०१९ पर्यंत चालणार आहे. सन २०१९-२०२० चा अंतरिम अर्थसंकल्प बुधवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. शनिवार दि. २ मार्च रोजी दुष्काळावर चर्चा करण्यासाठी या दिवशी कामकाज सुरु राहणार आहे. या अधिवेशनकाळामध्ये विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयके, तर विधानपरिषदेचे एक प्रलंबित विधेयक मांडण्यात येणार आहे.

 

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तर विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@