किरकोळ वाढीसह शेअर बाजार बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : गुंतवणूकदारांच्या संमिश्र प्रतिसादात मंगळवारी भारतीय शेअर बाजार किरकोळ वधारणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३४ अंशांनी वाढत ३६ हजार ६१६ स्तरावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअऱ बाजाराचा निफ्टी १० हजार ९३४ अंशांनी वधारला. तो २२ अंशांनी वधारला होता.

 

मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी काहीशी सावध भूमिका घेतली. मंगळवारी सकाळी शेअर बाजार घसरला. दिवसभरात तो ३६ हजार ७१७ च्या वरच्या स्तरावर तर ३६ हजार ५०५ या निचांकावर जाऊन आला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण झाली. यात गृहपयोगी वस्तू, वित्तीय संस्था, वाहन आणि खासगी बॅंकांचे शेअर तेजीत दिसून आले. सार्वजनिक बॅंका, टेलिकॉम, आरोग्य, उर्जा आणि बांधकाम क्षेत्रात घसरण झाली.

 

निफ्टीच्या मंचावर वाहन क्षेत्रात आलेल्या तेजीमुळे निफ्टी सावरण्यास मदत झाली. ऑटो क्षेत्रात हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा एण्ड महिंद्रा आणि बजाज ऑटोमध्ये झालेल्या खरेदीमुळे शेअर वधारले. निफ्टीतील ५० शेअर पैकी ३० शेअर वधारले तर १९ शेअरमध्ये घसरण झाली.

 

वधारलेले शेअर

 

सेन्सेक्समध्ये रिलायन्स निप्पोन लाईफ असेटमध्ये ६.६३ टक्के, बलरामपुर चीनी मिल्स ५.६२ टक्के, गृह फायनान्स लिमिटेड ५.४० टक्के, डिएचएफएल ५ टक्के, झी एन्टरटेन्मेन्ट ४.६८ टक्क्यांनी वधारले. एनएससीच्या मंचावर डॉ. रेड्डी १.६२ टक्के, हीरो मोटोकॉर्प १.५४ टक्के, युपीएल १.३४ टक्के, महिंद्रा एण्ड महिंद्रा १.१६ टक्क्यांनी वाढ झाली.

 

घसरलेले शेअर

 

बीएसईमध्ये रिलायन्स पावर ३०.१२ टक्के, आरकॉम २७.९५ टक्के, सुझलॉन २३.२६ टक्के, जेपी एसोसिएट १४.६० टक्के, सीजी पावर १४.३८ टक्के, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स २.२१ टक्के तर निफ्टीमध्ये भारती इन्फ्राटेल १.०२ टक्के, जेएसडब्ल्डू स्टील ०.९० टक्क्यांनी घसरला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@