पुण्यात ३५०० फूटावरून कोसळले विमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |
 

इंदापूर : पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील रूई गावात ग्लेडर प्रकाराचे प्रशिक्षणासाठी वापरले जाणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे. हे विमान सुमारे ३ हजार ५०० फुटांवरून कोसळले. दरम्यान यात कोणतिही जीवितहानी झालेली नसून विमानातील शिकाऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

 

अपघातस्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. इंदापूरमध्ये बाबीर रूई गावातील शाळेजवळ हे विमान कोसळले आहे. प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या या ग्लेडर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान खाली कोसळले. प्रशिक्षणार्थी सिद्धार्थ टायटस बा यात जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला बारामतीला हलवण्यात आले आहे.

 

सकाळी १० वाजता अक्कलकोटहून बारामतीला निघालेले हे विमान १२ वाजून ५ मिनिटांनी बाबीर शाळेजवळ कोसळले. वैमानिकाने प्रसंगावधान राखल्याने हे विमान निर्जन स्थळी कोसळले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@