मातोश्रीवर खलबंतं; राजकारणातील ‘चाणाक्य’ही उपस्थित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |



मुंबई : मातोश्रीवर शिवसेना खासदार-आमदार आणि नेत्यांची महत्वाची बैठक मंगळवारी दुपारी पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, अनंत गीते, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आदींसह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती.

 

मुख्य म्हणजे निवडणूका आणि राजकारणातील चाणाक्य, अशी ओळख असेलेले प्रशांत किशोर यांचीही यावेळी उपस्थिती होती. नवी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील प्रमुख नेते आणि खासदारांना तातडीने मुंबईत बोलावून घेतले होते.

 

या बैठकीत युतीबाबत चर्चा झाल्याचे विश्वसनीय सुत्रांचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या घोषणेला पक्षातूनच विरोध झाला आहे. भाजपसह जाण्याच्या निर्णयाबाबत पक्षांतर्गत गट पडले आहेत. त्यामुळे शिवसेना आता काय निर्णय घेते याकडे साऱ्या राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान देशाचा पुढील पंतप्रधान शिवसेना ठरवेल, अशी प्रतिक्रीया शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिली आहे. पुढील वाटचालीची सुत्रे उद्धव ठाकरे जुळवीत आहेत, असे सुचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@