‘हिंमतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही’- नितीन गडकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
नवी दिल्ली : “माझ्यात किती हिंमत आहे आणि मी किती प्रामाणिक आहे, यासाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची मुळीच गरज नाही,” अशा सडेतोड शब्दात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला हाणला.
 

नितीन गडकरी भाजपचे असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी खरे बोलण्याची हिंमत दाखवली, आता त्यांनी राफेलवरही सत्य सांगावे,’ असे ट्विट राहुल गांधींनी केले होते. त्यांच्या या ट्विटला गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच उत्तर दिले. गडकरी यांनी एकूण चार ट्विट करीत, राहुल गांधींच्या विविध मुद्द्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, “राहुल गांधीजी, माझ्या हिंमतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पण एका पक्षाचा अध्यक्ष असतानाही आमच्या सरकारवर हल्ला करण्यासाठी तुम्हाला प्रसारमाध्यमांनी अतिरंजित केलेल्या वृत्तांचा आधार घ्यावा लागतो, याचे मला आश्चर्य वाटते. तुम्हाला हल्ला करण्यासाठी दुसऱ्यांचे खांदे शोधावे लागतात, यातच मोदीजी आणि आमच्या सरकारचे यश आहे. राहिला मुद्दा तुम्ही उचललेल्या मुद्द्यांचा, तर मी छातीठोकपणे सांगू शकतो की, राफेलमध्ये आमच्या सरकारने देशाचे हित समोर ठेवूनच आजवरचा सर्वाधिक पारदर्शक व्यवहार केला आहे,” असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

 

घटनात्मक संस्थांवरील हल्ल्याबाबत गडकरी म्हणाले की, “आमच्या आणि काँग्रेसच्या डीएनएमध्ये हाच फरक आहे. आम्ही लोकशाही आणि घटनात्मक संस्थांवर विश्वास ठेवतो म्हणून तुमची ही खेळी काम करीत नाही. मोदीजी पुन्हा पंतप्रधान बनतील आणि आम्ही मजबुतीने देशाला विकासाच्या शिखरावर पोहोचवू. तुम्ही भविष्यात समजूतदारपणे आणि जबाबदारीने वागाल,” अशी आशा असल्याचेही गडकरी यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हटले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@