हिटलर दीदी : भाजपने साधला व्यंगचित्रातून निशाणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |



लखनऊ : शारदा चिट फंड गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी ताब्यात घेतल्याने देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान उत्तर प्रदेश भाजपाने ममता बॅनर्जींवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये ममता बॅनर्जी यांना हिटलरच्या रुपात दाखवले आहे. ममता बॅनर्जी श्चिम बंगालमध्ये हिटलरशाही करत असल्याची टीका भाजपने केली आहे.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवसांपूर्वी रॅलीसाठी पश्चिम बंगालला जाणार होते. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगला पश्चिम बंगाल प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यावरुनही उत्तर प्रदेश भाजपाने ममतांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला होता. आदित्यनाथ हेलिकॉप्टरमधून उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हेलिपॅडवर काटे असल्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर खाली उतरू शकत नाही, असे व्यंगचित्र भाजपाने ट्विटरद्वारे प्रसिद्ध केले आहे.

 
 
 

दरम्यान, तिसऱ्या व्यंगचित्रात सीबीआय अधिकारी एका पिंजऱ्यात दाखवले आहेत. पिंजऱ्याची चावी बंगाल पोलिसांच्या हातात आहे. 'देशातील जनता तुमचे कारनामे पाहत आहे. हिटलर दिदी. तुम्हाला आणि तुमच्या महाठगबंधनमधल्या साथीदारांना जनता नाकारेल, यात शंका नाही,' अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यात आले आहे.

 

ममता बॅनर्जी यांनी गेल्याच महिन्यात कोलकात्यात देशातील २२ पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणत एक मोठी सभा घेतली. यानंतर आता सीबीआय विरुद्ध ममता या संघर्षात जवळपास २० पक्षांनी ममता यांना पाठिंबा दिला आहे. त्यावर भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका करत विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@