पंतप्रधान मोदींच्या आईंनी त्यांच्याकडून मागितले होते ‘हे’ वचन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तेव्हा त्यांच्या आई हिराबेन मोदी यांनी नरेंद्र मोदींना यशाचा कानमंत्र दिला होता. “तू काय करतोस हे मला माहीत नाही, पण तू कधीच लाच घेणार नाहीस, असे मला वचन दे. कधीही हे पाप करू नकोस.” असे हिराबेन मोदी यांनी नरेंद्र मोदींनी सांगितले होते. आई हिराबेन यांच्या याच शब्दांची आपल्यावर छाप पडली. असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखती दरम्यान सांगितले.
 

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या प्रसिद्ध सोशल मीडिया पेजला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी ही गोष्ट सांगितली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी आणखी एक गोष्ट सांगितली. मोदींनी घेतलेली पंतप्रधानपदाची शपथ हा क्षण त्यांच्या आईसाठी फार विशेष असा आनंदाचा क्षण नव्हता. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा मोदींच्या आई हिराबेन यांना जास्त आनंद झाला होता. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी आपल्या आईची त्यांनी भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी या आठवणींना उजाळा दिला.

 
 
 

अनेकवेळा लोक मला विचारतात, की तुम्ही पंतप्रधान झाल्यावर तुमच्या आईच्या काय भावना होत्या? कारण त्यावेळी प्रत्येक ठिकाणी माझे नाव घेतले जात होते. माझे फोटो लावले जात होते. सगळीकडे उत्साहपूर्ण वातावरण होते. परंतु मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो, हा माझ्या आईसाठी मैलाचा दगड होता.असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडण्यापूर्वी मोदींनी अहमदाबादमधील आपल्या घरी जाऊन आई हिराबेन यांची भेट घेतली होती. मोदी अहमदाबादला पोहोचले तेव्हा सगळीकडे आनंद, जल्लोष सुरु होता. हिराबेन मोदी यांना आपला मुलगा गुजरात राज्याचा मुख्यमंत्री होणार हे आधीच कळले होते.

 
त्यावेळी आईने माझ्याकडे पाहिले आणि मला मिठी मारली. नंतर ती म्हणाली की तू गुजरातला परतलास याचा सर्वात जास्त आनंद आहे. असे आई त्यावेळी म्हणाली. आईचा स्वभाव हा असाच असतो. आपल्या आजुबाजूला काय चालले आहे, याचा आईला काही फरक पडत नसतो. फक्त आपले मूल आपल्याजवळ असावे, एवढीच तिची अपेक्षा असते. जुन्या दिवसांमध्ये आईला कोणी सांगितले की तुमच्या मुलाला नोकरी मिळाली आहे. तर ती गावभर मिठाई वाटत असे. त्यामुळे आईला मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा गोष्टींनी फरक पडत नाही. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@