जीमेलमध्ये आले 'हे' ३ नवे फीचर्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : अनेकांच्या रोजच्या वापरातील जीमेलमध्ये तीन नवीन फीचर्स आले आहेत. तसेच जीमेल आपल्या फीचर्समध्ये ‘बंडल रिमाइंडर’ आणि ‘पिन मेल’सारख्या फीचर्सची चाचणी करत आहे. ‘अनडू/रिडू’, ‘स्ट्राईकथ्रू’, आणि ‘डाऊनलोड एज डॉट.ईएमएल’ हे तीन नवीन फीचर्स आहेत.
 

अनडू/रिडू : जीमेलच्या ‘अनडू/रिडू’ या नव्या फीचरमुळे अनेक जीमेल यूजर्सना फायदा होणार आहे. अनडू फीचरमुळे चुकून डिलीट केलेले कॉन्टॅक्ट तुम्ही पुन्हा मिळवू शकता. मेल लिहिताना जीमेल यूजर्सना केवळ अनडूचा पर्याय उपलब्ध होता. आता रिडू पर्यायदेखील देण्यात आला आहे.

 

स्ट्राईकथ्रू : स्ट्राईकथ्रू यूजर्सना व्हिज्युअल क्यूद्वारे सूचना देत होते. त्यामुळे यूजर्सना मेल टाइप करताना त्रास व्हायचा. असे गुगलचे म्हणणे आहे. यासाठी गुगलने आता एक शॉर्टकट पर्याय दिला आहे.

 

डाऊनलोड एज डॉट.ईएमएल : जीमेल यूजर्स या डाऊनलोड एज डॉट.ईएमएल या फीचरद्वारे डाऊनलोड मॅसेजला आपल्या ईमेलमध्ये अॅटेचमेंट म्हणून अॅड करू शकतात.

 
 

 
 
 

असे वापरा हे फीचर्स नवीन मेल कंपोज करताना जीमेलच्या कंपोजविंडोमध्ये जाऊन फॉर्मेटिंग मेन्यूवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला अनडू/रिडू आणि स्ट्राईकथ्रूचा पर्याय दिसेल.

 
 


 
 

नवा डाऊनलोड फॉर्मेट नव्या डाऊनलोड फॉर्मेटसाठी तुम्हाला आलेल्या मॅसेजमध्ये जाऊन उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करावे लागणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ड्रॉपआऊट मेन्यू उघडेल. या मॅसेजच्या शेवटी तुम्हाला डाऊनलोड मॅसेजचा पर्याय दिसेल. जीमेल यूजर्सना जीमेलचा वापर सुरळितपणे करता यावा यासाठी हे नवे फीचर्स आणले आहेत. या नव्या फीचर्सच्या बाबतीत जीमेल यूजर्सना काही समस्या उद्भवल्यास त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. असे गुगलने सांगितले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@